प्रेम भक्ती व रुक्ष भक्ती । ह.भ.प. वैभवी श्री

कीर्तन विश्व पॉडकास्ट (Kirtan Vishwa Podcast)

31-01-2022 • 49 mins

आपण नेहमी भक्ती करतो परंतु या नामस्मरण आणि भक्तीमधून जे फळ प्राप्त व्हायला हवे ते मात्र मिळताना दिसत नाही. कारण त्या नामभजना बरोबर साधकाच्या मनामध्ये जे अष्टसात्विक भाव जागे व्हायला पाहिजेत त्याकडे लक्ष दिले जात नाही. एकदा सकाळी किंवा संध्याकाळी नामस्मरण केले आणि काम झाले असे नसून, मनामध्ये सतत भगवंताचे स्मरण चालू राहिले पाहिजे. या आधारावरच प्रेम भक्ती आणि रुक्ष भक्ती यामधील फरक सांगितला आहे. यासंबंधी "नाम आठविता सद्गदित कंठी" या अभंगातून वैभवी श्री ताई आपल्याला उपदेश करीत आहेत.