स्वा. सावरकर चरित्र- अंदमान पर्व । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे

कीर्तन विश्व पॉडकास्ट (Kirtan Vishwa Podcast)

27-12-2021 • 1 hr 5 mins

सेवा वेगळी व काज वेगळे. काज करणे म्हणजे देवाचे कार्य करणे. देवाची जी तीन कामे आहेत ती यथाशक्ती करणे म्हणजे देवाचे काज. चांगल्यांचे संगोपन, दुष्टांना शासन आणि धर्माचे पुनरुत्थान ही तीनही कार्ये सावरकरांनी केली. अंदमानच्या तुरुंगात देशसेवेसाठी सक्त मजुरीची शिक्षा भोगताना त्यांनी सज्जन कैद्यांचे केलेले प्रबोधन, त्यांना छळणाऱ्या इंग्रजाला बसवलेली जरब आणि समाजातील अज्ञानाचे केलेले उच्चाटन, ही कार्ये पाहता सावरकर दास भक्तीतील श्रेष्ठ दास आहेत. याचे गुणगान बुवांनी या कीर्तनामध्ये सादर केले आहे.

You Might Like