उत्तम संतती कोणाला म्हणावे ? । ह.भ.प. नम्रताताई निमकर

कीर्तन विश्व पॉडकास्ट (Kirtan Vishwa Podcast)

17-01-2022 • 1 hr 5 mins

घराण्याचे खरे वैभव कोणते तर प्रत्येक घरामध्ये उत्तम संस्कार असलेली संतती असणे हेच घराण्याचे खरे वैभव आहे. आशा भक्ताच्या जन्मामुळे साऱ्या वंशाचा - कुळाचा उद्धार होतो. असे समर्थ रामदासस्वामी महाराज सांगतात. याच तत्वाला अनुसरून आधुनिक काळातले विष्णुशास्त्री दीक्षित यांनी श्री गणेश उपासना करून कसा दिव्य पुत्र प्राप्त केला आणि त्या पुत्राने आपल्या कुळाचे कसे उद्धरण केले ही कथा सौ. नम्रताताई नारदीय कीर्तनातून आपणासमोर मांडत आहेत.