स्वा. सावरकर चरित्र - लंडन पर्व । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे

कीर्तन विश्व पॉडकास्ट (Kirtan Vishwa Podcast)

20-12-2021 • 1 hr 5 mins

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाडले । हे संतवचन प्रसिद्धच आहे. याचेच जणू भाषांतर असा समर्थ रामदास स्वामींचा एक श्लोक आहे. "सदा बोलण्या सारिखे चालता हे । " या कीर्तनात ह्या श्लोकावर निरुपण केले आहे. ‘भारताच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही आत्मार्पण सुद्धा करू’ असे सावरकर म्हणाले आणि ते शब्द सार्थ केले. या कीर्तनात सावरकरांचे परदेशातील कार्य, त्याची व्याप्ती त्याचे परिणाम आणि हे घडवताना सावरकरांच्या कुटुंबियांना केवढ्या संकटांना तोंड द्यावे लागले, याचा मोठा तपशील येथे ऐकायला मिळणार आहे.