Sudhakar Chodankar

Sudhakar Chodankar

देव व भक्त, सद्गुरू व शिष्य यांच्यातील आत्यंतिक प्रेमाचे, आत्मीयतेचे संबंध प्रकट करणारी ही भक्तिरसपूर्ण ऑडिओ मालिका आहे. माझे सद्गुरू श्री परमानंदस्वामी यांच्या प्रदीर्घ सहवासात मी घडत गेलो अन त्यांचाच होऊन राहिलो. श्रीपरमानंदस्वामीच्या 'आनंदाचे डोही' या भक्तिरसपूर्ण काव्यसंग्रहाने वेडच लावले मला. त्यातील विविध पदांचा आस्वाद घेता घेता सुधाकर या नावारूपाचा मी, त्यांचा भक्त होऊन राहिलो. परिणामी मनन, चिंतन अन ध्यासाच्या अनुभवातून माझ्या ठिकाणी आनंदाच्या उर्मि सतत दाटून येत राहिल्या. या उर्मि शब्दरूप होताना "अंतरंग तरंगांचे" ही ऑडिओ मालिका साकार होऊन आपली भेट घेत आहे ही केवळ परमानंदाची कृपा. read less
Religion & SpiritualityReligion & Spirituality
सुखाचे हे सुखं श्रीहरी मुखं
03-11-2023
सुखाचे हे सुखं श्रीहरी मुखं
सुखाचे हे सुखं श्रीहरी मुखं- पांडुरंगाचे परमभक्त श्री संत नामदेव महाराज यांचे हे उद्गार आहेत. सुख म्हणजे आपणा सर्वांना कळते.त्यासाठी देवाकडे आपण दुख: नको , सुखं हवे अशी वारंवार प्रार्थना करतो. पण नामदेव महाराज सुख न म्हणता सुखाचे सुख म्हणत आहेत. हे सुखाचेही सुख म्हणजे काय हो ? सुखालाही सुखी करणारे असे काय आहे? तर श्रीहरी मुख. जसे ज्ञानेश्वर माऊली म्हणते. आम्ही प्रसन्नतेच्या मागे नाही लागलो पण प्रसन्नता अमूची वेडी झाली, त्याला आम्ही काय करणार? “निवृत्तींनाथा, लागली तुमची ऐसी गोडी, तेणे प्रसन्नता जाहली अमूची वेडी “ अगदी असेच संत नामदेव महाराज सांगत तर नाहीत ना? इथे सर्वच सुखांचे मूळ, जिथे सुखही नाही दुख:ही नाही तर केवळ प्रगाढ शांती समाधान आनंदाचे अस्तित्व अनुभवास येते असे हे श्रीहरी मुखं संत नामदेव महाराज अनुभवत आहेत. या अनुभवाचे नेमकेपण काहीसे या एपिसोड मधून प्रकट होत आहे. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sudhakar-chodankar/message
देवा तुझ्या गाभार्‍याला उंबराच नाही
27-10-2023
देवा तुझ्या गाभार्‍याला उंबराच नाही
उंबरठा नसणे म्हणजे असीम, अनंत, अमर्याद होणे. असा केवळ भगवंत आहे अन् त्याच्या एकांतिक भक्तीने केवळ भक्तच या अनुभवाचा होत असतो. मन बुद्धी,विचार, कल्पना , संस्कार, समज, मान्यता या साऱ्या मानसिकतेच्याही पलीकडे पोचणे म्हणजेच सूक्ष्माहून सूक्ष्म होणे अन् व्यापकाहून व्यापक होणे. या स्थितीला उंबरठा नसणे म्हणतात नाही का? नाहीतर मांजर आडवी गेली, कोणी शिंकला, तीन तिघडा काम बिघडा असे मानसिक विविध उंबरठे घेऊन कारागृहात जगणारे खूप असतात, भक्ती मात्र छलांग मारते अन् भगवंताचे करून ठेवते. असेच काहीसे पाहूया, ऐकु ,या एपिसोड मधून. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sudhakar-chodankar/message
कांदा, मुळा,भाजी
20-10-2023
कांदा, मुळा,भाजी
कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी – परमभक्त श्री संत सावतामाळी यांचेकडून केवळ भक्तीच्या आवेगातून हे आनंदाचे उद्गार प्रकट होत आहेत. भक्ति हेच जिवन अन जीवन हीच भक्ति या आंतरिक अनुभवाची ते जणू ग्वाहीच देत आहेत. डोळ्यांनी कांदा, मुळा, भाजीपाला, लसूण मिरची कोथिंबीरच पहात आहेत ते, पण दृष्टीला दिसते काय तर अवघी विठाई, अवघा श्रीहरी. अवघा झाला माझा हरी. जर भगवंत अवघा भक्ताच्या अनुभवाचा होतो तसा भक्तही अवघा भगवंताचा होत. भक्ति काही तुकड्या तुकड्यांची नसते. सलग अन सातत्याची असते. भक्तीला टक्केवारी नसतेच मुळी. भक्ति केवळ पूर्ण नाही तर संपूर्ण असते. तेव्हा संत श्री सावता माळी यांच्या मळ्यात उगवून कांदा, मुळा, भाजी आलीय पण हृदयात मात्र ही विठाई ,हा श्रीहरी खेळतोय. चला तर, हा भक्तीचा मळा पाहूया आपण. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sudhakar-chodankar/message
खरं-खोटं-खरकटं
13-10-2023
खरं-खोटं-खरकटं
खरं खोटं खरकटं - राजपदाचा अनुभव घेणारा जनक राजा स्वप्नात अत्यंत दीन, केविलवाणा झाल्याचे अनुभवतो. दुसऱ्या राजाने त्याचा पराभव करून राजपद हिरावून काही दिवस बंदीवासात ठेवून, हाकलून दिलेले तो पाहतो. खायला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही असा रानोमाळ भिकेची याचना करणारा जनक राजा जेव्हा अचानक जागा होतो तेव्हा स्वताला रत्नजडित आलिशान पलंगावर पाहतो. त्याला समजेना हेखरे की ते खरे? तसाच उठतो अन् भेटेल त्याला विचारात सुटतो " हे खरे की ते खरे? " संभ्रमात पडलेल्या जनक राजाला अखेरीस अष्टावक्र ऋषि मार्गदर्शन करतात. तर पाहू आता हे ऋषि काय सांगतात ते. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sudhakar-chodankar/message
आर यू रेडी ( Are you Ready)
06-10-2023
आर यू रेडी ( Are you Ready)
" संध्याछाया भिवविती हृदया " ही एका काव्यातील ओळ आहे. उतारवयात हा प्रश्न म्हणा, चिंता म्हणा बहुतेक सर्वांनाच असते. पुढे कधीतरी घडणार्‍या या प्रसंगाची आठवण नको म्हणत दूर जाण्याचा केविलवाणा प्रयत्न आतल्या आत सुरू होत असतो. त्यातून भय, चिंता, निराशा येत असते. असे हे मानसिक अस्तित्व जणू प्रत्येकालाच प्रश्न विचारत असते " तू तयार आहेस का ? " ( आर यू रेडी ?). आता ही तयारी कोणती ? ज्याची पराकोटीच्या भक्तीने प्रत्यक्ष भगवंताशी यारी जुळलेली आहे त्याची तयारी आधीच झालेली असते. म्हणून भक्त या प्रश्नाने डळमळीत नाही होत. नाही ढेपाळत. उलट तो भक्तीच्या कैफात गातो. "काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ." संताचे हे वास्तव आहे. पण माझे काय ?आर यू रेडी ? हाच प्रश्न वीस एक वर्षापूर्वी माझ्या सद्गुरूंनी निरुपणातून मला विचारला ? त्यांनी त्यांच्या अनुभवाचे उत्तरही देवून ठेवले " यस, एव्हर रेडी " अन मी जागा झालो , अगदी प्राणपणाने अनेक वर्षे प्रत्येक रात्री,हर घडीला मी मला हेच विचारत आलो. या त्यांच्या उदगाराती , एक एक अक्षर मला ऊर्जा देते झाले. मी आहे हे खरे आहे पण "मी" नाही हे सत्य आहे या भानातून आत्यंतिक भक्तीचा उद्भव त्यांच्या कृपेने घडला. सद्गुरूंच्या मुखातील एक वचन, एक वाक्य तेच काय एक अक्षर देखील देहाच्या नश्वरतेचे भान देत अविनाशी ईश्वराशी एकरूप करून ठेवू शकते हेच या देवाचे , या भक्तीचे माहात्म्य. असेच काहीसे प्रकट झाले आहे " R U Ready ? " या एपिसोड मधून. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sudhakar-chodankar/message
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे
29-09-2023
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे- जिथे महाभारत यूद्ध घडले ते कुरुक्षेत्र . महाभारत महर्षि व्यासांकडुन प्रकट झाले. व्यास महर्षि केवळ कुरुक्षेत्र म्हणून थांबत नाहीत तर धर्मक्षेत्र असेही म्हणतात । का बरे ? युद्धाला भूमी लागते. ती आहे , कुरुक्षेत्र. पण खर्‍या अर्थाने धर्माची स्थापना होते कुठे ? कुरू क्षेत्रावर? वास्तविक धर्मक्षेत्र हे कुठे बाहेर नाही. ते तर प्रत्येकाच्या ठिकाणी असते. तिथेच तर धर्माची स्थापना होते. भगवंताने अवतार घेतला. जाहीर केले. "परित्राणाय साधुनाम विनाशाय च दुष्क्रुताम धर्मसंस्थानार्थाय संभवामि युगे युगे. " ही स्थापना केवळ अन केवळ भक्ताच्या अंत:करणातच होत असते. अशी स्थापना कुणाच्या ठिकाणी झाली म्हणताना काही हाताच्या बोटावर मोजावीत अशाच व्यक्ति महाभारतात सापडतात. युद्धासाठी हाताशी घेतले भगवंतांनी पांडवाना. पण त्यांचे ठिकाणी धर्म स्थापना झाली का , मला तरी संभ्रम आहे. पांडव सतप्रवृत्त,पराक्रमी होते पण भक्तीचा अग्रक्रम होता का त्यांचे ठिकाणी. केवळ राधा, विदुर, सुदामा, मैत्रेय हृषी, उद्धव, रुक्मिणी सोडले तर अशी कुणाच्या ठिकाणी ही धर्म स्थापना झाली. परमभक्त भीष्माचार्य, हे आत्मज्ञानी होते अन कृष्णाच्या ध्यानात ते यथार्थाने रंगले होते. एकूण अठरा अक्षौहिणी सैन्य लढले त्यात अकरा अक्षौहिणी सैन्य कौरवांचे ते सोडले तर उरते सात अक्षौहिणी पांडवाचे. ते सर्व भक्त झाले का ? तेव्हा धर्मास्थापना केवळ भक्ताच्या ठिकाणीच होत असते. या भक्तीच्या ध्यासाने या हृदयात या सत्य धर्माची स्थापना व्हावी या प्ररणेने हा एपिसोड अवतरला आहे. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sudhakar-chodankar/message
ए दिलें नादाँ
22-09-2023
ए दिलें नादाँ
भक्त म्हणजेच स्व च्या शोधात असलेला साधक जस जसा सावध अन जागृत होत असतो तस तसा तो अधिकाधिक एकांतिक होत रहातो. बहयांगाने जगात वावरतांना दिसतो तो पण त्याचे व्यवधान म्हणा , अवधान म्हणा त्याच्या आंतरिक अस्तित्वाला पहात असेते, काहीसे अलिप्तपणे. याला साक्षीभाव म्हणता येईल. या मुळे मनाच्या ठिकाणी येणारे अन जाणारे विचार , भावना, बहाव, कल्पना, आशा, इच्छा , आठवणी, या सार्‍यांचे न होता, अलिप्त रहाणे असेच काहीचे त्याचे असणे असते. पर्यायाने तो स्पष्टपणे केवळ वर्तमानातच असतो. त्यामुळे मानसिक भूतकाळ वा भविष्यकाळ त्याच्याठिकाणी नाही पैदा होत. वर्तमान हेच तर जीवन. मी एक व्यक्ति वा एक पर्सन (person) म्हणून असलेली ओळख कमी होत तो एक presense (व्यक्तिनिरपेक्ष ) अस्तित्व म्हणून असतो. अशा जाणिवेतून मनाचे जे खेळ दिसतात, त्याला संबोधून तो म्हणतो " हे दीलें नादाँ " ( हे मना, काय चालले आहे तुझे ?). असे हे भक्ताचे अस्तित्व कसे प्रकट होते ते या एपिसोडमधून पाहू आता. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sudhakar-chodankar/message
सुखालागी आरण्य सेवित जावे
08-09-2023
सुखालागी आरण्य सेवित जावे
सुखालागी आरण्य सेवित जावे - समर्थ रामदासस्वामी मनाच्या श्र्लोकातून सांगत आहेत. आपण अरण्यात जातो , पहातो. पण या अरण्याचे सेवन करावे असे समर्थ स्वामी संगत आहेत जेव्हा आपण एकध्या पदार्थाचे किवा रसाचे सेवन करतो तेव्हा अगदी समग्र रसपूर्णतेने आस्वाद घेतो नाही का ? या प्रक्रियेत एवढे एकरस होतो की डोळेही काही वेळा आपसूक मिटले जातात. बोलणे, ऐकणे, पहाणे सर्व काही स्तब्ध होते. निसर्गाचे असेच सेवन व्हावे. निष्पाप,निरागस, भव्य, दिव्य, प्रगाढ शांतिरूप असलेला हा अवकाश पहाता पहाता नि:शब्द होत मौनात उतरावे अन विरून जावे. त्या घडीला देहबुद्धीचा मी रहात नाही असे म्हणण्यापेक्षा जे काही उरतं तोच भगवंत. असेच काहीसे स्वामी समर्थ सूचित करताना दिसतात. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sudhakar-chodankar/message
येतो तो तो क्षण अमृताचा -
01-09-2023
येतो तो तो क्षण अमृताचा -
येतो तो तो क्षण अमृताचा -  असा कोणता क्षण आहे का, जो अमृत घेऊन येतो ?  क्षण ,  हे  असं काही भांडं आहे ज्यातून अमृत  देता घेता येतं?   तेव्हा प्रचलीत असलेल्या किवा प्रचलित नसलेल्या कोणत्याही भाषेतून मूळ सत्य  प्रकट होऊ शकत नाही. मुळात "क्षण म्हणून काही नाही " असे म्हणण्यापेक्षा  "मी आहे"  या जाणिवेचा हुंकार म्हणजेच क्षण. तेव्हा क्षण अमृताचे नसतात. जसा सिनेमागृहातला  पडदा कॉमेडी, क्रिमिनल, सस्पेन्स, गूढ, थ्रिलर, रोमांटिकक नसतो , त्यावरचे चित्र, प्रतिबिंब तसे असते. पडदा कायमचा अस्तित्वात असतो अगदी शुभ्रतेने.  सिनेमगृह चालू असो बंद असो .  पडदा येत नाही जात नाही चित्राप्रमाणे.  याला मी मूळ अस्तित्वाची शुद्ध बुद्ध गुणवत्ता म्हणतो. ती जेव्हा साधली जाते तेव्हा येणारे जाणारे सारेच क्षणभंगुर ठरते. मूळ अस्तित्व अमृता प्रमाणे कायम स्वरूपी असते.  या जाणिवेने देहरूपात  असलेला भक्त म्हणतो " येतो तो तो क्षण अमृताचा ---- "    --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sudhakar-chodankar/message
श्रद्धावान लभते ज्ञानम्
25-08-2023
श्रद्धावान लभते ज्ञानम्
श्रद्धा हा शब्द वरचेवर पहिला तर फार ठिसुळ वाटतो. कुणाला विचारले " काय रे बाबा, असे का ?" तर क्षणात उत्तर मिळते " नाही , माझी तशी श्रद्धा आहे " मला तर जाणवते श्रद्धा तीच जी स्वताच्या ठिकाणी शोधाला प्रवृत्त करत माझ्यातून साधक घडवते. साधकत्व हे भक्तीचे आविभाज्य अंग आहे. नाही तर माझी श्रद्धा आहे. एवढेच म्हणणे पुरेसे आहे का? फूल स्टॉप, पुढे काय ?. ज्याच्या पुढे साध्य नाही तो साधणार तरी काय? श्रद्धा हा भक्तीचा स्टारटिंग पॉइंट आहे. जसे धावपटू मैदानात उतरतात आणि शर्यतीसाठी एक पोज घेतात.पुढे वाकून दोन्ही हाताची बोटे जमिनीवर, एक पाय दुमडून, दुसरा मागे जमिनीला पुढच्या बोटांनी रोवलेला, मान सरळ , अविचल ध्येयाकडे, मन अतिशय सावध, जागरूक कधी व्हीसल वाजते त्या क्षणासाठी प्रगाढ शांत. हे जसे तशी श्रद्धा असते. श्रद्धा हा इवेंट नाही, सातत्याची स्थिति आहे साधकाची. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणतात " श्रद्धावान लभते ज्ञानं तत्पर: संयतेंद्रिय: | ज्ञानं लब्ध्वा पराशान्ती ...... || चला तर श्रद्धेने ऐकू भगवंत काय म्हणत आहेत. ........ --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sudhakar-chodankar/message
मोसे नैना मिलायके-
18-08-2023
मोसे नैना मिलायके-
छाप तिलक सब छीन ली रे , मोसे नैना मिलायके- हे उद्गार आहेत संत कवि अमीर खुसरो यांचे. ते म्हणतात, या सद्गुरुंनी कमालच केली. मी जो टिपिकल होतो, छापील होतो, मी जो माझ्या विचारांचा, समजूतींचा, संस्कारांचा , स्मृतीचा, भावनेचा, कल्पनेचा होतो आणि तोच हा "मी " या मठ्ठ मान्यतेचा होऊन राहिलो होतो ते सारे हरण केले सद्गुरूंनी. जेव्हा त्यांच्या नजरेला नजर मिळाली तेव्हा ही किमया घडली. त्यांच्या वृत्तीचा होऊन राहिलो मी. संत अमीर खुसरो आपले गुरु निजामुद्दीन औलिया याची अपार करणी सांगत आहेत आनंदाने. तेव्हा नेमकेपणाने यात काय अभिप्रेत आहे ते ऐकू या " मोसे नैना मिलायके " या एपिसोड मधून --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sudhakar-chodankar/message
उन्हाळा पावसाळा हिवाळा-जिव्हाळा
11-08-2023
उन्हाळा पावसाळा हिवाळा-जिव्हाळा
उन्हाळा, पावसाळा हिवाळा, ऋतू येतात. कधी पुढे मागे, कधी कमी जास्त होतात आणि निघून जातात पुन्हा येण्यासाठी. असा या प्रकृतीचा खेळ रंगत असतो. पण मी काही या निसर्गापासून वेगळा नाही. किंबहुना मी देखील या प्रकृतीतूनच जन्मलो आणि त्यातच विलीन होणार. असे असताना मला नेहमी प्रश्न पडतो की, या निसर्गाचे जसे ऋतू असतात तसा माझा ऋतू कोणता ? माझी वृत्ती कोणती? असे माझेच मला विचारताना जाणवले की, जसे निसर्गाचे ऋतू उन्हाळा, पावसाळा , हिवाळा तसा माझाही ऋतू आहे " जिव्हाळा". निसर्गाचे ऋतू जातात पुन्हा येण्यासाठी पण माझा जिव्हाळा मात्र कायमचा माझ्यात बरसत राहावा असेच वाटते. समस्त अस्तित्वापासून मी काही वेगळा नाही. किंबहुना हे समग्र अस्तित्व एकत्वाने, अखंडतेने माझ्यासह प्रकट आहे हीच तर खरी वास्तवता आहे. या जाणिवेतूनच जिव्हाळा जन्मतो ना? माझी आई म्हणताच उर भरून येतो, नाही का ? असेच या निसर्गाच्या, प्रकृतीच्या बाबतीत काहीसे होत असटे मला. तेव्हा हाच जिव्हाळा बरसतो आहे या एपिसोड मधून, तर वाट कसली पहाता ? आपणही चिंब होऊ यात. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sudhakar-chodankar/message
जिणे मस्त मधुर बस--
04-08-2023
जिणे मस्त मधुर बस--
जिणे मस्त मधुर - मस्त अन मधुर जगणे केवळ भक्ताचेच असते. कारण सदासर्वदा तो मधुराभक्तीतच असतो. ही त्याची रीयालिटि असते. वास्तवता असते. यामुळेच तो सदा मत्त असतो. या कैफातच असतो. माणूस खरे तर या अलौकिक धुंदीचीच अपेक्षा करतो. सर्वसामान्य मानसिकतेतून ही जेव्हा उपलब्ध होत नाही तेव्हा दुख: विसरण्यासाठी किवा तथाकथित सुखासाठी तो मादक पदार्थांचा आश्रय घेतो. खरेतर या कृतीने तो अचेतन असल्याचेच सिद्ध करत असतो. वास्तविक मूल ऊर्जेशी त्याची फारकत झालेली असते. ओरिजिनल ऊर्जा म्हणा चेतना म्हणा, भगवंत परमेश्वर म्हणा, या जाणिवेचा होणे हेच तर मानवी जीवनाचे प्रयोजन आहे. किंबहुना ही ऊर्जा जी येत नाही जात नाही. सदा सर्वदा असीमतेने भरभरून आहे ती ऊर्जा म्हणजेच भक्ताचे वास्तव असते. म्हणूनच तो भक्त गातो " जिणे मस्त मधुर, जिणे मस्त मधुर ". तर चला ऐकू या हा एपिसोड. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sudhakar-chodankar/message
फुलणे फुलांचे जगणे
28-07-2023
फुलणे फुलांचे जगणे
खरे तर फुलांचे फुलणे हेच जगणे असते नाही का? किंबहुना फुलांच्या अस्तित्वाला "जगणे" म्हणणे देखील फार रुक्ष वाटते. किती सहज सुंदर असतात फुलं ! प्रगाढ शांतीत, सखोल मौनात असलेली ही फुलं, जणू क्षणा क्षणाला अभूतपूर्व सौदर्याचा उत्कट साक्षात्कार करून देतात नाही का ? म्हणूनच फुलांचे जगणे, दिसा मासाने मोजणे हास्यास्पद वाटते मला. किती काळ जगलो म्हणण्यात काहीच रस नाही. त्या पेक्षा किती उत्कटतेने किती सुंदरतेने , सहजतेने, निष्पाप, निरागस शांत स्वरूपाने रमलो हेच महत्वाचे नाही का ? फुलांच्या मौनातले हे बोल मला सातत्याने ऐकू येतात . तुम्हालाही हे बोल ऐकायचे आहे का ? तर मग पाहू या एपिसोड " फुलणे फुलांचे जगणे ". --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sudhakar-chodankar/message